Allu Arjun’s viral video: दाक्षिणणात्य अभिनेता अल्लू अर्जुताच तुरुंगातून बाहेर आलाय. अल्लू अर्जुन घरी परतल्यावर त्याच्या कुटुंबियांचे भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झालेत. अल्लू अर्जुन घरी परतल्यावर त्याचे भव्य स्ससठलत झाले. For example, या क्षणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हहेत.
अल्लू अर्जुनचा तीन मिनिटांचा एक व्हहडिओ सोल मीडियासर व्हयरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत�����������������. तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला 13 डिसेंबर रोजी जामीन मिळाला होता पण तरीही त्याला 13 डिसेंबरची रात्र लॉकअपमध्ये काढावी लागली. अल्लू अर्जुनला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या बायकोने पहिली मिठी मारली. त्यानंतर घरी पोहचल्यावर आईने देखील लाडक्या लेकाची दृष्ट काढली
घरी पोहोचताच अभिनेत्याने मुलांना मिठी मारली
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन जेव्हा त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. याबाबतचा एक व्हिडिओ पीटीआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन घरी पोहोचला तेव्हा संपूर्ण कुटुंब त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. अल्लू गाडीतून खाली उतरून घराकडे जात असताना त्याचा मुलगा धावत येऊन त्याला मिठी मारतो.
अभिनेत्याला भेटल्यानंतर पत्नी स्नेहा खूप रडली
या व्हिडिओमध्ये अल्लूची मुलगी आणि त्याची पत्नी त्याच्याकडे अतिशय प्रेमाने आणि भावूकपणे पाहताना दिसत आहेत. मुलानंतर त्याची मुलगी वडिलांना प्रेमाने मिठी मारते. यानंतर त्याची पत्नी अल्लू अर्जुनला खूप प्रेमाने मिठी मारते, त्यानंतर अल्लू एक एक करून संपूर्ण कुटुंबाला भेटतो.
आईने काढली अल्लू अर्जुनची दृष्ट
यानंतर अल्लू अर्जुनची आज्जी देखील भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. अल्लू अर्जुनही तिला भेटल्यानंतर खूप भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. त्यानंतर अल्लू अर्जुनच्या आईनेली लेकाची दृष्ट काढून औक्षण करुन घरात घेतलं.
नेमकं प्रकरण काय?
पुष्पा-2 या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान हैदराबाद शहरातील संध्या या थिएटरमध्ये एक प्रीमिअर ठेवण्यात आला होता. याच प्रीमियरदम्यान लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच गर्दीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्याला सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र या निर्णयाविरोधात अल्लू अर्जूनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला. मात्र या सर्व प्रक्रियेदरम्यान त्याला 13 डिसेंबरची रात्र तुरुंगात घालावी लागली. 18 तास तो तुरुंगात होता.